बीड : बीडमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. बीड नगरपालिकेच्या समोर प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेनेने राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना जोरदार धक्का दिला आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होत आहे. हा राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे.
बीड नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढणार आहे. बीड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती.
जिल्हा परिषद सदस्य गंगाधर घुमरे, नगरसेवक अमर नाईकवाडे, फारुख पटेल, बाबूशेठ लोढा, नितिन लोढा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आणखी काही कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांचा प्रवेश सोहळा लवकरच पाक पडणार आहे. या प्रवेश सोहळ्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झालेली आहे.
Post a Comment