लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार...

नगर :लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानदेव भाऊसाहेब हराळ (रा. गुंडेगाव ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीतीने फिर्याद दिली आहे. 


एक नोव्हेंबर 2021 ते 10 नोव्हेंबर 2021 या दरम्यान एमआयडीसी येथील साईबन परिसरात ही घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडिताने सात मार्च 2022 ला रात्री नगर तालुका पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून हराळ विरोधात अत्याचारसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हराळ याने फिर्यादी युवतीला लग्नाचे आमिष दाखविले. या आमिषाने युवतीवर अत्याचार केला. अत्याचार केल्याने युवतीला गर्भधारणा झाली. त्याचे सोनोग्राफी रिपोर्ट काढण्यात आले. दरम्यानच्या काळात युवतीचे दुसर्‍या मुलासोबत लग्न जमले. 

हराळ याने युवतीसोबत लग्न जमलेल्या मुलाला सोनोग्राफी रिपोर्ट व्हाट्सअप व इन्स्टाग्रामवर पाठविले, बदनामी करत जमलेले लग्न मोडले. तसेच हराळ याने युवतीला शिवीगाळ, दमदाटी करून तु जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुला जीवे ठार मारून टाकेल, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

पीडित महिलेले सोमवारी, 7 मार्च 2022ला नगर तालुका  पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हराळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post