अमर छत्तीसे
श्रीगोंदा : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत जिल्हाध्यक्ष पदासाठी अहमदनगर जिल्ह्यातीन सात जण रिंगणात होते.त्यापैकी स्मितल वाबळे हे 22183 मतांनी निवडुन आले आहेत.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत उपाध्यक्षपदी 4000 मते मिळवून प्रशांत सिदनकर हे निवडून आले आहेत. श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी संदीप वागासकर, उपाध्यक्षपदी प्रवीण शिर्के, सागर साळवे व किरण चव्हाण अनुक्रमे निवडून आले.
स्मितल वाबळे हे गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. त्यांनी या अगोदर विविध पदांवर काम केलय. एनएसआयच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष तसेच युवक काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदावर ही त्यांनी या अगोदर काम केले आहे.
त्यांच्या या निवडीबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,आमदार सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे पाटील, महिला काँग्रेस ़च्या अध्यक्षा अनुराधा नागवडे, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे,माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब भोस, संचालक सुभाष शिंदे, प्रशांत दरेकर, विठ्ठल बापू जंगले, राकेश पाचपुते, गटनेते मनोहर पोटे, नगरसेवक सतिष मखरे, प्रशांत गोरे, निसार बेपारी, संतोष कोथंबिरे, समीर बोरा आदींनी अभिनंदन केले आहे.
स्मितल वाबळे यांनी या विजयाचे श्रेय मी सत्यजित तांबे व सर्व मित्र परिवाराला यांना दिल्या. या निवडबद्दल अहमदनगर जिल्ह्यातून तसेच श्रीगोंदा तालुक्यातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
Post a Comment