अमर छत्तीसे
श्रीगोंदा : तिने त्याला लाखोला गंडा घातला असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तो आणि तिचे तालुक्यात चांगले प्रस्त आहे. तिने त्याच्या जीवनात येऊन त्याला गंडा घातला आहे.
श्रीगोंदा तालुका हा नेहमीच संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात राजकारण व समाजकारण समतोल असते. पण सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात एक वेगळाच ट्रेंड निर्माण झाला आहे.
एकमेकांशी ओळख वाढवायची व या ओळखीचे रुपांतर मैत्रीत करून संबंधित पुरुष मंडळींना आपल्याकडे आकर्षित करायचे. माझे वरिष्ठ पातळीवर मोठी ओळख आहे असे सांगायचे व त्यानंतर सलगी करून पैशाची मागणी करायची असा गोरख धंदा चालू आहे.
हा प्रकार समाजातील सर्वच वर्गात सुरु आहे. एकीची माया एकावर जडली. त्यातून तिने चांगलीच माया गोळा केली आहे. आपण फसलो गेलो याची जाणीव त्याला झाली. पण सांगता येईना व बोलता येईना अशी त्याची अवस्था झाली आहे.
या प्रकरणाची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे. ते नेहमी एकत्र दिसणारे आता विभक्त दिसू लागल्यानेच तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
Post a Comment