श्रीरामपूर : येथील एमआयडीसीत परिसरातील एका कंपनीला आग लागली आहे. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.
या कंपनीला आग कशामुळे लागली अद्याप कारण अस्पष्ट झालेले आहेत. या कंपनीला लागलेल्या आगीने प्रचंड रुद्रावतार धारण केलेला आहे.
ही आग अटोक्यात आणण्याचे मोठे प्रयत्न करण्यात आले. घटनास्थळी श्रीरामपूर, लोणी, राहता, अग्निशामक दल दाखल झालेले असून आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ही आग कशाने लागली हे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. आगीच्या घटनेची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.
Post a Comment