राहुरी : गुरूकुल मंडळाचे जिल्हा पदाधिकारी राजेंद्र पटेकर व किरण रोकडे यांचे नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी परिषद व गुरूमाऊली मंडळात प्रवेश केला.
परिषदेचे राज्य नेते रावसाहेब रोहोकले व गुरूमाऊली मंडळाचे विचार सर्वसामान्य शिक्षकांना प्रतिष्ठा मिळवून देणारे असल्यामुळे राहुरी येथे संपन्न झालेल्या मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी परिषद व गुरूमाऊली मंडळात प्रवेश केला.
यामध्ये प्रामुख्याने संजय बोंबडे, अशोक भोसले, मनोज ओहोळ, बाळासाहेब संसारे, अनिल पवार, नाना सोमवते, किशोर मिस्किन, संजय भांडकोळी, पोपट शिंदे, सुभाष रोडे, संभाजी जाधव, भिमराज चव्हाण, श्रीराम पांडे, कचोरे कुंडलिक प्रकाश राठोड, मनिषा गायकवाड, मिनाक्षी पाळंदे, अनुराधा भिंगारदिवे, मनिषा बाबुराव गायकवाड, मिरा बोबडे, कविता राठोड, विजया पांडव, चित्रा पवार, पोपट शिंदे, सुभाष जाधव, विष्णू पोटे, गिते, अनिता मोरे आदींसह बहुसंख्य शिक्षकांनी रोहोकले यांच्या बरोबर गुरूमाऊली मंडळाच्या विचारधारेत काम करण्याचा निर्धार करत यापुढील काळात सर्वसामान्य शिक्षकांपर्यंत गुरूमाऊली मंडळाचे विचार प्रामाणिकपणे नेण्याचे काम करणार आहे. राहुरी तालुका भक्कमपणे रोहोकले गुरूजींच्या मागे उभा करण्याकरिता काम करणार आहोत, असा विश्वास यावेळी दिला.
यावेळी शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष विकास डावखरे, विकास मंडळाचे माजी अध्यक्ष संजय शिंदे, नाशिक विभागाचे बाबासाहेब पवार, शंकर गाडेकर, शिक्षक बँकेचे संचालक नाना बडाख, राजू मुंगसे, महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी तांबे, मिनाक्षी महांडुळे, अल्ताफ शहा, राजूभाई इनामदार, प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब रोहोकले, सुभाष गरूड,भाऊसाहेब फंड, रविंद्र अरगडे, अमोल लांबे आदी उपस्थित होते.
रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक परिषद ही प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकते, ही बाब आमच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक परिषदेमध्ये प्रवेश केला आहे. भविष्यामध्ये राहुरी तालुका त्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभा राहणार असून आणखी बरेच कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत. त्यांना देखील लवकरच शिक्षक परिषदेत प्रवेश देण्यात येणार आहे. राज्य प्रतिनिधी शंकरराव गाडेकर, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा कोषाध्यक्ष रविंद्र अरगडे, जेष्ठ नेते कल्याण राऊत यांना बरोबर घेऊन आदरणीय रावसाहेब रोहोकले गुरुजी यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार आहोत. - राजेंद्र पटेकर, कार्यकारी अध्यक्ष, शिक्षक परिषद, अहमदनगर
Post a Comment