अकोला : किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर काही दिवसांपूर्वी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चांगलेच चर्चेत आले आहेत. अकोल्यात किर्तनाच्या व्हिडिओ क्लिप काढून यूट्यूबवर अपलोड करणाऱ्यांसाठी त्यांनी विचित्र भाषेचा उपयोग केला. त्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.
इंदुरीकर महाराज म्हणाले, की अशा लोकांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. त्यांचं वाटोळं होईल. या वादग्रस्त विधानानंतर आता ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अकोला शहरातील कोलखेड भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचं किर्तन आयोजित केलं होते. यावेळी निरुपणा करताना इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर सडकून टीका केली.
इंदुरीकर महाराज म्हणाले, की माझ्या जीवावर आतापर्यंत 4 हजारांवर लोकांनी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून कोट्यावधी रूपये कमावले. याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणलं असल्याची तक्रार इंदुरीकर महाराजांनी केली.
याच कारणामुळे अशा लोकांबद्दल राग व्यक्त करत माझे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांना दिव्यांग मुलं होतील, त्यांचं चांगलं होणार नाही, असं ते म्हणाले.
Post a Comment