शिर्डी : शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. राहुल कनाल यांच्या मुंबईतील घरी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे.
यावेळी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यशवंत जाधव यांच्यापाठोपाठ शिवसेनेच्या दुसऱ्या नेत्याच्या घरी आयकर विभागानं धाडी टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय तसेच शिर्डी संस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल हे सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहे. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी सुरु आहे.
आज आयकर विभागानं मुंबईत आणि पुण्यात छापेमारी सुरु केली आहे. आयकर विभागाचं एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी आले असून त्यांनी झाडाझडती सुरू केली.
यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. राहुल कनाल हे घरी आहेत की, नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही.
Post a Comment