अमर छत्तीसे
श्रीगोंदा : महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी अनिल तोडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कॄषी सहाय्यक संघटनेची त्रैवार्षिक बैठक नुकतीच कर्जत येथे पार पडली. या बैठकीत अनिल तोडकर यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे.
यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी चंद्रकांत तांदळे, सचिन खेतमाळस, सुवर्णा भोस यांची निवड करण्यात आली.
यावेळी सचिवपदी रामदास भारती, उपाध्यक्षपदी अशोक आटोले, गणेश शेंदूरकर, प्रकाश नवले, उज्ज्वला शेळके, कार्याध्यक्षपदी शिवाजी शेळके, खजिनदारपदी लक्ष्मण अनारसे, प्रसिद्धिप्रमुखपदी अभिमान मुरकुटे, तालुका संघटकपदी राजेंद्र खामगळ, तालुका संघटक दिपाली लगड, तालुका संघटकपदी नामदेव नवसरे यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी श्रीगोंदे येथून आलेले तालुका निवडणूक अधिकारी संदीप बोदगे व सहायक निवडणूक अधिकारी संतोष झेंडे यांनी कामकाज पाहिलो.
Post a Comment