नगर : जिल्हा परिषद सर्व्हन्टस को ऑप क्रेडीट सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी पाथर्डी येथील संदिप विठ्ठलराव मुखेकर व संगमनेर येथील सरला शिवाजी कदम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संजय कडूस यांच्या नेतृत्वाखालील जय श्री गणेश पॅनलने २१ पैकी २१ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविलेले आहे. या नूतन संचालक मंडळाची मासिक सभा नुकतीच चेअरमन विलास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेत पॅनल प्रमुख असलेले संचालक संजय कडूस यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार संस्थेच्या सभासदांमधून २ तज्ञ संचालक नियुक्त करण्याची तरतूद असून त्यानुसार या जागा भरण्यात याव्यात अशी सूचना मांडली. त्यास उपस्थित सर्व संचालकांनी सहमती दर्शविली.
त्यानंतर संदिप मुखेकर यांच्या नावाची सूचना कल्याण मुटकुळे यांनी मांडली, त्यास सुधीर खेडकर यांनी अनुमोदन दिले. तसेच सरला कदम यांच्या नावाची सूचना अरुण जोर्वेकर यांनी मांडली त्यास अर्जुन मंडलिक यांनी अनुमोदन दिले. सर्व संचालक मंडळाने एकमताने या निवडीस मंजुरी दिली.
नूतन तज्ञ संचालक संदिप मुखेकर हे पाथर्डी पंचायत समितीत शिक्षण विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असून ते महाराष्ट्र राज्य लिपिक वर्गीय संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. तर सरला कदम या संगमनेर पंचायत समितीत आरोग्य विभागात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. नर्सेस संघटनेच्या त्या जिल्हा उपाध्यक्षा आहेत.
यावेळी व्हाईस चेअरमन काशिनाथ नरोडे, संचालक प्रशांत मोरे , विक्रम ससे , भाऊसाहेब चांदणे, राजू दिघे, दिलीप डांगे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्नील शिंदे, श्रीमती ज्योती पवार, श्रीकांत देशमाने, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, श्रीमती सुरेखा महारनूर ,श्रीमती मनीषा साळवे ,व्यवस्थापक राजेद्र पवार ,उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे उपस्थित होते.
Post a Comment