कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज करुणा शर्मा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांच्या नावाविषयी तांत्रिक मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे.
दरम्यान अर्ज दाखल केल्यावर त्यांनी सांगितले आहे की , माझ्याकडे सर्व कायदेशीर पुरावे आहेत. धनंजय मुंडे यांनी ६-६ मुले व अनेक पत्नी लपवल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. या अगोदर आमच्या दोघांवर सिनेमा काढल्यावर तो हिट होईल असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे.
करुणा शर्मा म्हणाल्या की, आमच्या प्रेमकहाणीवर पुस्तक अंतिम टप्प्यामध्ये असून त्यामधून अनेक पुरावे समोर आणणार आहेत. या पुस्तकामध्ये २५ वर्षाची आमची कहाणी असणार आहे. यामध्ये पुराव्याबरोबरच लग्नाचे फोटो देखील असणार आहेत.
हिंदी भाषेत हे पुस्तक लिहून झाले आहे. हिंदी आणि मराठी भाषेत हे पुस्तक असणार आहे. नावावरुन त्रुटी निर्माण होण्याच्या शक्यतेवर बोलताना त्यांनी सांगितले आहे की, माझ्याकडे जे पेपर आहेत त्याच्या आधारावर मी फॉर्म देखील भरला आहे. माझ्या कागदपत्रांमध्ये काही देखील त्रुटी नाहीत.
Post a Comment