नगर : लिंबाच्या भावात सध्या चढ उतार पहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी लिंबाचे 121 रुपये किलोपर्यंत भावाने मजल मारली होती.
हेच भाव 90 ते 95 रुपये किलोपर्यंत आलेले आहे. लिंबाला मागणी तेव्हढी असली तरी आवक वाढल्याने त्याचा परिणाम भावावर झालेला आहे.
उन्हाळ्या दिवसात नेहमीच लिंबाला चांगली मागणी असते. त्यामुळे लिंबाचे भाव कायम तेजीत येत असतात.यंदाही लिंबाला चांगली मागणी वाढलेली असून भावात तेजी येत आहे.
मात्र या तेजी आपल्याला फायदा व्हावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे. मात्र गेल्या दोन दिवसचही तेजी टिकून राहिली. आवक कमी असल्याने लिंबाच्या भावात तेजी आली होती.
ही तेजी कायम राहिली असती. मात्र आवक वाढत गेल्याने लिंबाच्या भावात पडझड होत आहे. ही आवक अशीत होत राहिली तर लिंबाचे.किलोचे भाव आणखी कोसळण्याची शक्यता आहे.
भाव मिळतोय म्हणून काहीजण अपरिपक्वच माल विक्रीस आणत आहे. त्यामुळे आवक वाढलेली दिसल्याने भावावर परिणाम होत आहे.
त्यामुळे प्रत्येक शेतकर्याने लिंबाची प्रतवारी करूनच विक्री करावी, असे आवाहन लिंबू उत्पादक शेतकर्यांमधून केली जात आहे.
Post a Comment