झेडपीतील कर्मचारी किटल्यांच्या खडखडातून सुटले... चहापेक्षा नेहमीच रहात होत्या किटल्या गरम...

अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : जिल्हा परिषदेतही अधिकारी व कर्मचार्यांनी चहापेक्षा किटली जास्त गरम असल्याचा अनुभव घेतला. त्यावरून सभागृहातही मान्यवर सदस्यांनी किटली चहा पेक्षा किटलीच जास्त गरम रहात असून खडखडाट करीत असल्याचे परखड मत व्यक्त केले आहे.


जिल्हा परिषदेत आजपासून आता प्रशासक राज आले आहे. त्यामुळे आता पदाधिकारी राज संपुष्टात आलेले असून अधिकारी राज सुरु झालेले आहे. आता.अधिकार्यांच्या धोरणानुसार कामकाज होणार आहे. कामकाज करताना प्रशासकांना पालकमंत्री व जिल्ह्यातील आमदारांचे मार्गदर्शन राहणार आहे. 

गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषदेतील काही सदस्यांच्या खासगी स्वीय सहाय्यकांचा अनेकांना त्रास झालेला आहे. कर्मचार्यांनी त्या व्यक्तीविरोधात उघड नाराजीही व्यक्त केलेली आहे.  सत्तेत असल्यामुळे कर्मचार्यांना काही बोलता येत नव्हते. चहा पेक्षा किटली गरम असल्याचा अनुभव अनेकांनी घेतला होता.

काहींनी चहा परवडले पण किटलीचा खडखडाट नको अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. काही सदस्यांनी किटलीचा होत असलेल्या.खडखडाटावर मान्यवरांकडे तक्रारी केेलेल्या आहेत.

प्रशासक राज आल्याने जिल्हा परिषदेत आता किल्ल्यांचा खडखडाट बंद होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post