साडेचार महिन्यानंतर डिझेल अन् पेट्रोल महागलं...

नवी दिल्ली : साडेचार महिन्यानंतर इंधनाच्या दरात वाढ होत आहे. डिझेल व पेट्रोलचे दर वाढणार अशी फक्त चर्चा सुरु होती. आज प्रत्यक्षात दर वाढले आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. 


देशात पेट्रोल-डिझेल महागले आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ झाली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेली आहे.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल  व डिझेलची दरवाढ होणार ही चर्चा सुरु होती. ती खरी ठरली.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल 112 डॉलर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल व डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.  

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 112 डॉलर प्रति बॅरेलवर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मंगळवारी म्हणजेच, आज सकाळपासून पेट्रोल 84 पैसे प्रति लीटर तर डिझेल 83 पैसे प्रती लिटरनं किरकोळ बाजारात वाढ होणार आहे. 

मुंबईत सध्या पेट्रोल 109.98 रुपये प्रति लीटर तर डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post