नगर : महिलांचे योगदान हे प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय आहे. अशा प्रसंगातून कुणीतरी पाठीवर कौतुकाची थाप दिली तर काम करण्यातील उत्साह नक्कीच वाढतो. हेच कार्य शिक्षक परिषदेने महिला दिनी केले आहे. हा सन्मान या महिला भगिणींच्या कायम स्मरणात राहिल, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती सुरेखा गुंड यांनी केले.
नगर तालुका शिक्षक परिषद व गुरूमाऊली मंडळाने या महिला भगिणींचा महिला दिनी सत्कार केला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी परिषदेचे राज्यनेते रावसाहेब रोहोकले, गटशिक्षणाधिकारी रविंद्र कापरे, राज्य उपाध्यक्ष संजय शेळके ,केंद्रप्रमुख दळवी, विभागीय कार्याध्यक्ष बाबा पवार, गुरूमाऊलीचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, विकास मंडळाचे माजी अध्यक्ष संजय शिंदे, संचालिका मंजुषा नरवडे, विश्वस्त सुनंदा आडसुळ, सोनवणे, नगर तालुका महिला अध्यक्षा सरस्वती गुंड, विक्रम नरवडे, संतोष शिंदे,संतोष गवळी, श्रीनिवास एल्लाराम, प्रभाकर झेंडे, राजाराम झावरे, वसंत शिंदे, हामीद सय्यद ,भगवान बोरुडे, राजेंद्र काळे, संदिप बोठे, दिलिप बेरड, घुमरे सर ,विद्या सालके, श्रीकांत नरवडे आदी उपस्थित होते.
गुंड.म्हणाल्या की, शैक्षणिक क्षेत्रात महिलांची संख्या मोठी आहे. ज्ञानदान करणा-या महिला शिक्षिकांना विविध कार्यक्रमातून गौरविण्यात येते. परंतु कार्यालयीन कामकाज सांभाळताना शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात कार्यालयात काम करणा-या महिला कर्मचा-यांचे योगदान हे विशेष असते.
याचीच जाणीव ठेवून नगर तालुका शिक्षक परिषद व गुरूमाऊली मंडळाने या महिला भगिणींचा महिला दिनी केलेला सन्मान हा प्रेरणादायी आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी शिक्षण विस्तार निर्मला साठे, शिक्षण विस्तार अधिकारी मंदाकिनी लोटके, केंद्रप्रमुख सुनंदा शिंदे, वरिष्ठ सहायक सुलभा गोडसे, कनिष्ठ.सहायक आरती दारकुंडे ,विषय तज्ञ मोनाली चौधरी, प्रिया कुलकर्णी, मीना झरेकर, सोनल सातपुते, अश्विनी धामणे, ताराबाई गवळी, विद्या ठाणगे, तसेच आदर्श शिक्षिका किशोरी भोर, जयश्री घोलप, रोहीणी लगड, अनूजा रिंगणे आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय दळवी यांनी तर सूत्रसंचलन सुरेश कार्ले केले. सरस्वती गुंड यांनी स्वागत केले. बाळासाहेब वाबळे यांनी आभार मानले.
Post a Comment