श्रीगोंदा : कृषी पंपांची वीज तोडणी मोहीम बंद करावी व वीज बिल माफ करावे आणि शेतकऱ्यांना आठ तास दिवसा वीज देण्यात यावी दोन टप्प्यात एफ आर पी चा शासन निर्णय मागे घेऊन ऊस उत्पादकांना एक रकमी एफआरपी मिळावी या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब मांडे यांनी दिला आहे.
याबाबत भाऊसाहेब मांडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी, अतिवृष्टी, चक्रीवादळ, आर्थिक मंदी अशा कारणांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी दिवाळखोरीत निघाले आहे. अशातच महाराष्ट्र शासन व प्रशासन शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थी रोज आत्महत्या करत आहे.
कृषी पंपांची वीज तोडणी मोहीम बंद करावी व वीज बिल माफ करावे आणि शेतकऱ्यांना आठ तास दिवसा वीज देण्यात यावी दोन टप्प्यात एफ आर पी चा शासन निर्णय मागे घेऊन ऊस उत्पादकांना एक रकमी एफआरपी मिळावी, राज्य शासनाच्या कर्जमुक्तीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत थकीत कर्ज माफी मिळावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे.
मढेवडगाव गावामध्ये नगर दौंड रस्त्याच्या कडेला शाळा असल्या कारणाने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे हे टाळण्यासाठी मढेवडगाव गावात डीवाईडर व फुटपाथ आवश्यक आहे, असेही मांडे यांनी या निवेदनात म्हटले आहे.
न्याय व हक्काच्या मागण्यांसाठी 12 मार्चला मढेवडगाव राष्ट्रीय महामार्ग 160 अहमदनगर दौंड रोड येथे सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे, असे भाऊसाहेब मांडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
Post a Comment