धाडीच्या अगोदर भाजपालाच माहिती कशी मिळतेय...

नवी दिल्ली : ईडी व सीबीआय यांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभारतोय. या संस्था जर स्वतंत्र असतील तर भाजपचे काही नेते या संस्थांच्या धाडीच्या आधीच त्याची माहिती सोशल मीडियावरून कशी काय देतात? यासंबंधी माहिती लीक होते, त्याबद्दल केंद्र सरकारने खुलासा करावा, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 


केंद्रीय तपास यंत्रणांवरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक झाल्या. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. 

त्यामध्ये कारवाई होऊन अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे मंत्री आता तुरुंगात आहेत. नुकतंच ईडीने मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई करत त्यांची सहा कोटी 45लाखाच्या संपत्तीवर टाच आणली आहे. ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरेंना आव्हान असल्याचे सांगितलं जातंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post