नवी दिल्ली : मागील पाच दिवसांतील चौथ्यांदा पेट्रोल अन् डिझेलच्या भावात वाढ झाली आहे. पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागले आहे.
शुक्रवारीही पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रतिलिटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. मागील पाच दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या दरात 3.20 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 84 पैशांनी वाढले आहे.
डिझेलचे दर 85 रुपये प्रति लिटरने वधारले आहेत. मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 113.29 पैसे आणि एक लिटर डिझेलची किंमत 97.49 पैसे झाली आहे. तर दिल्लीत पेट्रोलचा दर 98.61 रुपये आणि डिझेलचा दर 89.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.
सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ चालूच राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने महागाई आणखी वाढण्याचा अंदाज आहे. युक्रेन-रशिया युद्ध लांबण्याच्या संकेतामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. युरोपीयन संघातील काही देश रशियावरील तेलावर निर्बंध आणण्याची शक्यता असल्याने तेलाच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे.
Post a Comment