महिलांना समानतेची वागणूक द्या...

नेवासा : महिला शिक्षिका तसेच विविध क्षेत्रांमध्ये सक्षमपणे काम करणाऱ्या महिला भगिनींना समानतेची वागणूक द्या ,महिलाच समाजाच्या खरा खऱ्या आधारस्तंभ आहेत ,असे प्रतिपादन नेवासा तालुका गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांनी केले. 


जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व गुरुकुल मंडळ उपशाखा नेवासा यांनी गटशिक्षणाधिकारी पटारे, तसेच पंचायत समिती मध्ये कार्यरत सर्व महिला भगिनींचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.  त्यावेळी त्या बोलत होत्या.


पटारे म्हणाल्या की, असे कोणतेही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या मागे आहेत. त्यामुळे आपणही समाजात कार्यालयात किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना महिला भगिनींच्या अडचणी सोडवण्याकडे प्राधान्य दिले पाहिजे.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे म्हणाले की, महिलांचा सन्मान राखणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या घरातही महिलांचा आदर केला पाहिजे.

यावेळी गटशिक्षणाधिकारी पटारे यांच्यासह वरिष्ठ सहाय्यक शोभा दिघे, श्रीमती सिंधू माने , प्रमिला महेंद्रकर, शीला घोरपडे यांचा सन्मान करण्यात आला. 

शिक्षक नेते मुख्याध्यापक संतोष भोपे, शिक्षक नेते संदीप जंगले, केंद्रप्रमुख नामदेव शिरसाठ, विक्रम गोसावी, बाळासाहेब बनकर, शंकर साबळे, प्रकाश मुरकुटे ,राहुल आठरे, अमोल काळे, नितीन डहाळे, योगेश पंडुरे, पुरुषोत्तम बोरूडे, नितिन खर्चन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन तंत्रस्नेही शिक्षक राहुल आठरे यांनी तर प्रकाश मुरकुटे यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post