अमर छत्तीसे
श्रीगोंदा : कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक दोन दिवसांपूर्वी पार पडली. पण या बैठकीत आवर्तन २५ मार्चला सोडण्याचा निर्णय झाला. परंतु दुसऱ्या दिवशी बैठकीला उपस्थित असणाऱ्या नेत्यांना आवर्तन लवकर सोडण्याचा साक्षात्कार झाला.
सोशल मीडियावर आवर्तन २५ ऐवजी १७ मार्चला सोडले तर शेतकर्यांना फायद्याचे होईल असा संदेश व्हायरल करण्यात आले.
कुकडी लाभक्षेत्रात पाण्याची तीव्रता वाढू लागली आहे. शेतकरी पाण्याअभावी मेटाकुटीला आला आहे. यातच दोन दिवसांपूर्वी कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत २५ मार्चपासून आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. संबंधित नेते मंडळी आपल्या मतदार संघात आल्यानंतर हे आवर्तन २५ ऐवजी १७ मार्च पासून सुरू करण्यात यावे यासाठी आपण जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी केली. आवर्तन १७ मार्चपासून सुरू करण्यात येणार असल्याचे समाजमाध्यमांवर संदेश पाठवत आहेत.
ज्यावेळी बैठक होती. त्यावेळी आवर्तन लवकर सोडण्यासाठी यांना कोणी आडवले होते का असा सवाल सर्वसामान्य शेतकरी उपस्थित करत आहेत.
फक्त पाण्याचे श्रेय घेण्यासाठी हे नेतेमंडळी पुढे येत आहेत. पण ज्या वितरिकांना पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही, त्याची जबाबदारी घेण्यासाठी का पुढे येत नाहीत असा सवाल उपस्थित होत आहे.
Post a Comment