अमर छत्तीसे
श्रीगोंदा : चांडगाव गावच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत आजपर्यंत गावात सुमारे दोन कोटी रुपयांची कामे केली आहेत. यामध्ये आमदार बबनराव पाचपुते. जिल्हा परिषद सदस्य पंचशीलाताई गिरमकर यांची मोलाची साथ भेटली आहे असे सरपंच मनिषा रविंद्र म्हस्के यांनी सांगितले
जागतिक महिला दिनानिमित्त बोलताना म्हस्के म्हणाल्या की, राजकारण व माझा दुरूनही संबंध नव्हता. पण सासरी स्थानिक राजकारणात कुटुंब सक्रिय होते. पती रविंद्र ही आपला व्यवसाय सांभाळून गावातील राजकारणात लक्ष देत होते.
गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्यावर अचानकपणे मला सरपंच पदासाठी उमेदवारी करायला सांगितले. गावातील जनतेने सरपंच म्हणून मला संधी दिली, असे मनिषा म्हस्के म्हणाल्या.
या संधी नंतर मला चांडगाव गावच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते जिल्हा परिषद सदस्य पंचशीलाताई गिरमकर यांनी लाखमोलाची मदत केली आहे.
गावातील चांडेश्वर मंदिराचा तिर्थक्षेत्र विकास आराखडा मध्ये समावेश केला. तसेच अंतर्गत रस्ते जिल्हा परिषद शाळा आदींसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला याचे समाधान वाटते असे सरपंच मनिषा म्हस्के म्हणाल्या.
Post a Comment