नगर ः आरोग्य सहाय्यिका यांचे पर्यवेक्षक पदी पदोन्नती द्यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामीण नर्सेस संघटनेतर्फे करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण नर्सेस संघटनेच्या संस्थापिका अध्यक्ष वंदना धनवटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांना निवेदन दिले.
या वेळी संघटनेच्या उपाध्यक्ष गीतांजली कोरडे, उषा शिंदे, रत्नमाला शिंदे आदी उपस्थित होत्या.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन १९८३ ते १९८८ या कालावधीपासून सेवेत असलेल्या एएनएम यांची सेवा नियुक्ती दिनांकापासून धरावी. त्यांना ३० वर्ष अश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा.
तसेच सेवानिवृत्त होताना होणारी वसुली थांबवावी, प्रलंबित ३० वर्ष आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळावा, आदिवासी क्षेत्रात चटईक्षेत्र २६० रुपये प्रमाणे प्रत्येक महिन्याला वसुली थांबवावी, तीन वर्षापूर्वी एकरकमी ४९०० रूपयांची वसुली केली गेली आहे.
आदिवासी क्षेत्रात बदली झाल्यानंतर एकस्तर प्रोत्साहन भत्ता मिळत नाही, तो मिळावा, जीपीएफचे तसेच पेंन्शन प्रकरण, रजा रोखिकरण आदी रकमा वेळेवर मिळाव्यात, अश्वासीत योजनांचे तसेच आर्थिक फरक, सातवा वेतन आयोगाचे फरक वेळेवर मिळावे, सेवानिवृत्तांचे प्रकरण सेवानिवृत्तीनंतर लवकरात लवकर सुरू करावे, मेडिकल बिल वेळेवर मिळावी, जीपीएफ व डीसीपीएसच्या स्लिप अदयावत करून द्याव्यात, आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
Post a Comment