अकोळनेर सरपंच निवडीनंतरच्या मिरवणुकीची जिल्हाभर चर्चा...

नगर : विधानसभा निवडणुकीनंतर कर्जत मतदार संघातील आमदार रोहित पवार यांच्या विजयी मिरवणुकीची जिल्हाभर अद्यापही सुरु आहे. तशीच काहीशी मिरवणूक अकोळनेरमधील सरपंच निवडीनंतर निघाली असून तिची जिल्हाभर चर्चा आहे.


अकोळनेर (ता. नगर) ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रतीक रघुनाथ शेळके यांनी बाजी मारली असून १२ पैकी ७ मते मिळवत ते सरपंचपदी निवडून आले आहेत. त्यांचे विरोधी उमेदवार गणेश बाळासाहेब भोर यांना ५ मते मिळाली.

अकोळनेर ग्रामपंचायतची निवडणूक फेब्रुवारी २०२१ मध्ये आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नाने बिनविरोध झाली होती. त्यावेळी सरपंचपदी दादा भाऊसाहेब कोळगे तर उपसरपंचपदी  प्रतीक रघुनाथ शेळके यांची निवड झाली होती. 

मध्यंतरीच्या कालावधीत प्रतीक शेळके यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर वंदना संग्राम गायकवाड यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आलेली आहे.


आमदार रोहित पवार यांची विजयी मिरवणुकीत गुलाबाची.उधळण जेसीबीने केली होती. तसाच काहीसा प्रकार अकोळनेरमध्ये करण्यात.आला आहे. जेसीबीच्या सहाय्याने हार सरपंचासह मान्यवरांच्या गळ्यात घालण्यात आला. या अनोख्या स्वागताची जिल्हाभर चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post