अमर छत्तीसे
श्रीगोंदा : तालुक्यातील आढळगाव पंचायत समिती गणात काम करण्याची संधी मिळाली या संधीतून गणातील बहुतांशी गावात शासकीय निधी अतिशय तुटपुंजा होता. पण आवश्यक तिथे विकास कामे केली काही ठिकाणी स्वखर्चाने कामे केली. पण जनतेशी जोडलेली नाळ तुटू दिली नाही सर्वांच्या सुख दुखात नेहमी सहभागी होत राहिले, असे श्रीगोंदा पंचायत समितीच्या उपसभापती मनिषा कोठारे यांनी सांगितले.
पंचायत समितीच्या माध्यमातून आढळगाव पंचायत समिती गणांमध्ये मागील पाच वर्षांमध्ये अनेक विकास कामे करण्यात आलेली आहेत. पंचायत समिती सदस्य म्हणून मतदारांनी संधी दिल्याने ही कामे करता आली आहेत.
पंचायत समितीच्या आढळगाव गणामध्ये राजकारणा ऐवजी आपण विकास कामे केल्याने गणाचा पूर्णता कायापालट झाला आहे. पंचायत समिती अंतर्गत गरजू महिला लाभार्थ्यांना सहा शिलाई मशीन व एक पीठ गिरणी पुरवलेली आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 119 शेतकऱ्यांना गाय गोठा प्रकरणे मंजूर केलेली आहे. शेळ्यांसाठी निवारा ची तीन प्रकरणे मंजूर केलेले आहेत. आज अखेर सुमारे 100 पेक्षा जास्त गाय गोठ्याची प्रकरणे ची कामे सुरू आहेत.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सण 2016 /17 ते सन 2020 /21 अखेरपर्यंत 248 घरकुलांना अडचणी असणारे कामे पूर्ण झाले आहे. राज्य योजना अंतर्गत रमाई पारधी शबरी आवास योजने अंतर्गत 338 घरकुले मंजूर झाली आहेत.
15 वा वित्त आयोग पंचायत समिती स्तर अंतर्गत गणातील सर्व गावांमध्ये सदरचे निधीतून मोठ्या प्रमाणावर विकासात्मक कामे करता आली याचे मोठे समाधान असल्याचे उपसभापती मनिषा कोठारे यांनी सांगितले.
कोठारे म्हणाले की राजकारण हा माझा पिंड नव्हता परंतु महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार श्री बबनरावजी पाचपुते दादा व स्व सदाशिव अण्णा पाचपुते यांच्या आग्रहाखातर मी पंचायत समितीची निवडणूक लढवली माझ्या गणातील जनतेनेही मला भरभरून मते दिली व गणाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व जनतेचे व पक्षश्रेष्ठींची आभारी आहे.
माझ्या पंचायत समिती गणाचा विकास हेच माझ्या अंतिम ध्येय ठेवून मी मागील पाच वर्षे काम केले त्याचीच पावती म्हणून मला पंचायत समितीमध्ये उपसभापती म्हणून मागील पाच वर्षात दोनदा काम करण्याची संधी मिळाली. मागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तालुक्याची उपसभापती या नात्याने प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे कोरोना
सारख्या जागतिक महामारी च्या काळात देखील अनेकांना माझ्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केला याचे समाधान वाटते. पाच वर्षाच्या काळामध्ये मी माझ्या गणातील व तालुक्यातील जनतेची नाळ कधीही तुटून दिली नाही यात माझे पती श्रीशंकर आण्णा कोठारे व दिर श्री दत्ता भाऊ कोठारे यांनी देखील मोलाचे सहकार्य केले असे मनीषा कोठारे यांनी सांगितले.
Post a Comment