मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, नाशिकमध्ये वादळी वा-यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही भागात गारपीटही होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात अडकला आहे.
काढणीला आलेल्या गहू, कांदा, हरभरा यासारख्या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
Post a Comment