मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. तीन मार्चपर्यंत ते ईडी कोठडीत होते. त्यांची ईडी कोठडी आज संपल्याने त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सोमवारपर्यंत म्हणजे सात मार्चपर्यंत ईडी कोठडीत वाढ केली आहे.
ईडी कोठडीत असताना मलिक यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं होते. त्यानंतर त्यांना पुन्हा ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले आहे.
पीएमएलए न्यायालयात युक्तीवाद करताना ईडीने ६ दिवसांची कोठडीची मागणी केली. ईडीतर्फे अँड. अनिल सिंग यांनी युक्तीवाद केला. ईडीच्या कोठडीत असताना काय झालं याची माहिती ईडीने कोर्टाला दिली.
नवाब मलिक रुग्णालयात दाखल असल्याने चौकशी करता आली नाही. त्यामुळे आणखी ६ दिवसांच्या कोठडीची मागणी ईडीतर्फे करण्यात आली.
आरोपी सरदार शहवली खान याने दिलेल्या जबाबातील तपशील पाहता नवाब मलिक यांची अधिक चौकशी करायची आहे. त्याचबरोबर या प्रकरणात आम्ही आणखी काहींचे जबाब नोंदवले आहेत. यामुळे कोठडी मिळावी असे ईडीतर्फे सांगण्यात आले आहे.
Post a Comment