नगर : येथील नेप्ती उपबाजार समितीमध्ये आज (गुरुवारी) लाल कांद्याने भाव खालला असून गावरान कांद्याच्या भावात घसरण झाली आहे.
नेप्ती उपबारात 11 हजार 735 गोण्यांची आवक झाली आहे. एकूण कांदा 6454 क्विंटल आवक झाली. एकंदरीतच मागील आठवड्यापेक्षा कमी कांदा यंदा बाजारात आला आहे.
गुरुवारी नेप्ती उपबजार समितीमध्ये लाल कांद्याला मिळालेले भाव पुढील प्रमाणे आहे. एक नंबर कांद्याला 800 ते 1200 भाव, दोन नंबर कांद्याला 500 ते 800 भाव, तीन नंबर कांद्याला 250 ते 500 भाव, चार नंबर कांद्याला 100 ते 250 भाव मिळाला आहे.
गावरान कांद्याच्या गोण्याची 31 हजार 949 कांदा गोळ्यांची आवक झाली आहे. एकंदरीत गावरान कांद्याचा भाव उतरला असला तरी आवक मात्र या अठवड्यात वाढली आहे.
गावराण कांद्याला मिळालेला भाव पुढील प्रमाणे एक नंबर कांद्याला 850 ते 1100, दोन नंबर कांद्याला 550 ते 850, तीन नंबर कांद्याला 300 ते 550, चार नंबर कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.
Post a Comment