अकोले ः अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (गुरुवारी) ६३९९ कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याला अवघा 1351 रुपायांचा भाव मिळाला.
अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव होत आहेत. शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजार भाव मिळण्यासाठी लिलावाच्या दिवशी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत व कांदा ५० किलो बारदान गोनित, वाळ्वुण, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्रीसाठी बाजार समितीचे आवारात आणावा.
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव : एक नंबर कांदा : 1151 ते 1351, दोन नंबर कांदा : 951 ते 1151, तीन नंबर कांदा : 751 ते 951, गोल्टी कांदा : 851 ते 1151, खाद कांदा : 150 ते 551 या प्रमाणे बाजार भाव मिळाले आहेत.
बाजार आवारात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच प्रत्येकाने हाताला सॅनेटाईज करणे, नाकाला व तोंडाला मास्क लावणे, बाजार आवारात कुणीही थुंकू नये, सोशल डिस्टनसिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.
Post a Comment