नगर ः नेप्ती उपबाजार समितीत सध्या लाल कांद्याला चांगला भाव मिळत असून गावरान कांद्याला कमी भाव मिळत आहे. लाल कांद्याच्या तुलनेत गावरान कांद्याला सुमारे 100 रुपयांचा भाव कमी मिळत आहे.
नेप्ती उपबाजार समितीत आज (गुरुवारी) लाल कांद्याची 37 हजार 810 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 1300 रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.
एक नंबर कांदा ः 900 ते 1300, दोन नंबर कांदा ः 680 ते 900, तीन नंबर कांदा ः 455 ते 680, चार नंबर कांदा ः 100 ते 455.
नेप्ती उपबाजार गावरान कांद्याची 28 हजार 735 गोण्यांची आवक झाली. यामध्ये एक नंबर कांद्याला अवघा 1200 रुपयांचा भाव मिळाला.
एक नंबर कांदा ः 925 ते 1200, दोन नंबर कांदा ः 650 ते 925, तीन नंबर कांदा ः 400 ते 650, चार नंबर कांदा ः 100 ते 400.
शेतकर्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करूनच आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment