ग्रामसेविकांचा सत्कार....

अमर छत्तीसे

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुका विधी सेवा समितीतर्फे ग्रामसेविका यांचा सत्कार महिला दिनानिमित्ताने करण्यात आला.


महिला दिनानिमित्त महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा येथे जिल्हा सत्र न्यायाधीश शेख, न्यायाधीश शुक्ल,  न्यायाधीश काकडे यांच्या हस्ते ग्रामसेविकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विधी सेवा समितीचे गटविकास अधिकारी शेलार, श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे, पोलीस निरीक्षक ढिकले, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. झराट आदी उपस्थित होते. 

महिला दिनानिमित्त ग्रामसेवका जयश्री कंद, अश्विनी व्यवहारे, गायकवाड दीपा, शुभांगी शिंदे पंचायत समिती कर्मचारी समिना शेख, गीता दिवाकर, सविता या महिला कर्मचाऱ्यांचा यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. 

सर्व ग्रामसेविका व पंचायत समिती कर्मचारी यांचे ग्रामसेवक संघाचे राज्य कार्याध्यक्ष  विठ्ठलराव घाडगे, राज्य सचिव अनिल जगताप, राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ गोरे यांनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post