सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या....

नगर : माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला.  या छळाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 


रेखा अनिल गुंजाळ (वय 24, रा. सोनेवाडी, ता. नगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. सोनेवाडी शिवार, मेहेकरी फाट्याजवळ ही घटना घडली. या प्रकरणी पती, सासू, दीर यांच्यासह चौघांविरूध्द नगर तालुका पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत रेखाचा भाऊ मोहन अण्णा वेठेकर (वय 30, रा. पांढरेवाडी, कोळगाव ता. श्रीगोंदे) यांनी फिर्याद दिली आहे.  अनिल रामकिसन गुंजाळ, अमोल रामकिसन गुंजाळ, मंगल रामकिसन गुंजाळ व दीपक गोरख गुंजाळ (सर्व रा. सोनेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रेखाचा विवाह अनिल सोबत झाला होता. ती सासरी नांदत असताना आरोपींनी तिचा घरगुती खर्चासह, शेती खर्चासाठी माहेरून पैसे आणावे यासाठी छळ केला. तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post