पंचायत समिताच्या माध्यमातून लगड यांच्याकडून मोठे काम... आता लगड यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करावे...

अमर छत्तीसे

श्रीगोंदा : कोळगाव गणासह तालुक्यात विकास कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. ही सर्व कामे माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य पुरूषोत्तम लगड यांनी केली आहे. त्यामुळे त्यांनी आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून परिसराचा विकास करावा, अशी अपेक्षा सर्वसमान्यांमधून व्यक्त केली जात आहे.


माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांच्या पंचायत समिती सदस्य पदाची पाच वर्षे पूर्ण झाली. या पाच वर्षांमध्ये माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांनी कोळगाव गणामध्ये अनेक विकास कामे मंजूर केली. 

कोळगाव , कोरेगाव सुरेगाव ,घारगाव, कोथूळ आदी गावांमध्ये त्यांना विकासाचा भागीरथ दौडवला आहे.त्यामुळे कोळगाव गटाचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे.

लगड यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून जर इतकी विकास कामे केलेली आहेत. तर ते जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून गेल्यास या परिसरात अनेक विकास कामे करतील, अशी आशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह  सामान्य नागरिकांना लागली आहे.

त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक लगड यांनी लढवून या परिसराचा विकास करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

विकास कामे पंचायत समितीच्या माध्यमातून केल्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेची निवडणूक खूप सुकर ठरणार असल्याचे मत लगड समर्थकांमधून व्यक्त होत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post