पुणे : शहरातील वानवडी परिसरात ‘इसिस’ या दहशवादी संघटनेसोबत संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने वानवडीत एका घरात छापा मारला आहे. याप्रकरणात एकाची चौकशी करण्यात आली.
काही कागदपत्रे आणि इलेक्ट्राॅनिक्स वस्तू असे साहित्य जप्त करण्यात आले.तल्हा लियाकत खान (वय ३८) वास्तव्यास आहे. इसिसशी संबंध असल्याचा संशयावरून एनआयएच्या पथकाने खान याच्या घरावर छापा टाकून कारवाई केली.
खान याच्या घरातून कागदपत्रे आणि इलेक्ट्राॅनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या असून, या प्रकरणात खान याची चौकशी सुरू असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे.
इसिस देशभरात घातपात करण्याच्या तयारीत आहे. यातूनच विविध भागात छापेमारी सुरु आहे.
Post a Comment