सोसायटीचे बाशिंग बांधलेल्यांची ऐनवेळी माघार...

नगर : जिल्ह्यात सोसायटी निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीमुळे एकाच गटाचे दोन गट तयार होऊन निवडणूक होत आहे. 


काहींनी सोसायटी निवडणुकीचे बाशिंग बांधले होते. मात्र ऐनवेळी ते सोडले असून अलिप्त भूमिका घेतल्याची चर्चा रंगत आहे. 

जिल्ह्यात सध्या सोसायटी निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार कोणालाच उलगडत नाही. विजयी उमेदवार ऐनवेळी पराभूत झालेले दिसून येत आहे. त्यामुळे गावागावातील वातावरण चांगलेच तापले आहे.

सोसायटी निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच काहींनी आपण निवडणूक लढविणार असून स्पष्ट केलेले आहे. मात्र ऐनवेळी उमेदवारी न करता मौनव्रत धारण केले आहे. त्यामुळे इतरांची मात्र पंचाईत झालेली आहे. 

निवडणुकीअगोदर आपणच लढणार असे सांगणारी मंडळी ऐनवेळी थंड का झाली हे मात्र समजू शकले नाही. त्यामुळे अनेक गटातील प्रमुखांमध्ये हीच चर्चा सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post