जिल्हा बँकेतील आग जिल्हा उपनिबंधक कार्यालयामुळे आटोक्यात...

नगर : जिल्हा बँकेच्या तिसर्‍या मजल्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हा बँकेची काही विभागाची कार्यालये आहेत. सायंकाळी पावणे सात वाजता बँकेच्या लेखापरीक्षण विभागामधून धूर निघाल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या कर्मचार्‍यांना निदर्शनास आले. 


ही बाब लक्षात येताच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तातडीने अग्निशामक दलास पाचारण केले. तोपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या कर्मचारी व बँकेच्या स्टाफ च्या मदतीने उपलब्ध संसाधनच्या मदतीने आग आटोक्यात आणायचा प्रयत्न केला. 

त्यानंतर मनपा आणि एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत. आग आटोक्यात आणली. सुमारे एका तासाच्या प्रयत्नांनी आग विझवण्यामध्ये अग्नीशामक दलाला यश आले. 

सदर आगीमध्ये बँकेच्या लेखापरीक्षण विभागाची खोली पूर्णपणे जळून खाक झाली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अजिबात नुकसान झालेले नाही. कोणत्याही प्रकारची जीवितहानी व दुखापत झालेली नाही.  

प्राथमिक अंदाजानुसार विजेच्या शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post