अमर छत्तीसे
श्रीगोंदा : महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर लाखोल्या वाहून वातावरण तापून देणार्या नेत्यांकडून मात्र महाविकास आघाडीतील पक्षाच्या माजी आमदारांना आपल्या वाहनात घेऊन फिरण्याचा प्रकार जिल्ह्यात घडला आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहे.
राज्यात महाविकास आघाडीला अनेक प्रकरणामध्ये विरोधी पक्षाने अडचणीत आणण्याची एकही संधी सोडलेली नाही. एकीकडे आरोप-प्रत्यारोप करून महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचे काप भाजपाच्या खासदार व आमदारांकडून नेहमीच केले जात आहे.
महाविकास आघाडीच्या कारभारावर जोरदार टीकाही केली जात आहे. ही टीका जिल्ह्यात चांगलीच चर्चेत असतानाच एका विरोधी गटाच्या लोकप्रतिनिधीने महाविकास आघाडी सरकारमधील एका पक्षाच्या माजी आमदाराला बरोबर घेऊन एका कार्यक्रमाला हजेरी लावली.
यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. एकीकडे पक्षांवर आरोप करून त्याच पक्षातील इतर नेत्यांना बोरबर फिरणे म्हणजे मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचे मत समाज माध्यमावर अनेकांनी व्यक्त केले आहे.
मतदारांना भासविण्यासाठी ही टीका-टिपन्नी करून आपला राजकीय स्वार्थ त्या लोकप्रतिनिधीकडून साधला जात असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे.
त्या लोकप्रतिनिधीबरोबर जिल्ह्यातील इतरही एक आमदार कायम कार्यक्रमांमध्ये दिसून येतात. विशेष म्हणजे त्या लोकप्रतिनिधीचे व त्या पक्षाच्या जेष्ठ नेत्यात वाद असतानाही ती नेते मंडळी कायमच त्या नेत्याला मदत करीत असल्याची चर्चा सुरु आहे.

Post a Comment