नगर : शाळकरी मुलीची छेड काढून तिच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या रोड रोमियो विरुद्ध पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुझ्या मुलीची व इतर मुलीची छेड काढली. तु काय करतो ते पाहतो अशी धमकी देवून फायटरने मुलीच्या पित्याला जखमी केले.
संबंधिताविरोधात पोलिसांनी विनयभंग करणे व बालकांचे लैंगीक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.ही घटना एक एप्रिलला घडली. संबंधिताने त्या तरुणीच्या सायकलला
मोटारसायकल आडवी घालून तिला अडविले. तुझा मोबाईल नंबर मला दे तु मला आवडतेस असे म्हणून छेडछाड केली. मुलीने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. मुलीचे वडील ४ एप्रिलला सकाळी मुली सोबत
शाळेत जात असताना संबंधित भेटला. त्याने मुलीच्या वडीलांना दमदाटी करुन जबर मारहाण केली.

Post a Comment