सीईओंना आढळले ते केंद्रप्रमुखांसह विस्तार अधिकारी अन् गटशिक्षणाधिकार्यांना दिसले नाही...

नगर : जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून सकाळी सुरु झालेल्या आहेत. शाळेत शिक्षक वेळेत येतात की नाही हे पहाणी करण्याच्या सूचना केंद्रप्रमुखांना देण्यात आल्या होत्या.त्यात केंद्रप्रमुखांना काहीच आढळून आले नाही. मात्र सीईओ यांनी दिलेल्या भेटीत शाळा बंद आढळून आली आहे.


जिल्ह्यात गटशिक्षणाधिकार्यांसह केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांनी एकाच दिवसात तब्बल 462 शाळांना भेटी दिल्या. या शिक्षकांनी शाळा भेटीचा अहवाल दिलेला आहे. मात्र किती शिक्षक शाळेसा उशिरा आले याची मात्र कोणीच अहवाल दिला नसल्याची चर्चा सुरु आहे. 

मात्र मुख्य कार्यकारी संभाजी लांगोरे यांनी शाळेला दिलेल्या भेटीत होळकर वस्ती येथील शाळा त्यांना बंद आढळून आली. त्यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गटशिक्षणाधिकार्यांसह इतर अधिकार्यांना अनेक ठिकाणी शाळांची वेळ सकाळची असतांना विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी दिसून आली. तसेच अनेक शाळांचा परिसर अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले आहेत. संबंधीत ठिकाणी शिक्षकांना सुचना देण्यात आल्या असून बिगर परवानगी गैरहजर शिक्षकांवर कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post