आनंदवाडी सेवा संस्थेवर आमदार पाचपुते गटाचा झेंडा

श्रीगोंदा : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आनंदवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी शांताराम भोईटे व उपाध्यक्षपदी बाळासाहेब गिरमकर यांची निवड झाली आहे.  या सेवा संस्थेवर आमदार बबनराव पाचपुते गटाचा झेंडा फडकला आहे.


या संस्थेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्या पंचशीलाताई गिरमकर व युवा नेते रमेश गिरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल उभा करून सत्ता मिळवली आहे. 

या निवडणुकीत तालुक्यातील एका बड्या नेत्याने मोठी ताकद लावली होती पण रमेश गिरमकर यांच्या योग्य नियोजनामुळे सत्ता काबीज करण्यात यश मिळविले. या संस्थेवर आमदार बबनराव पाचपुते गटाचा झेंडा फडकवला आहे. 

या यशाबद्दल आमदार बबनराव पाचपुते, माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्रतिभाताई पाचपुते, ज्येष्ठ नेते लक्ष्मण नलगे आदींनी अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post