महाविकासमधून स्वाभिमानी बाहेर...

कोल्हापूर : महाविकास आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडली आहे. कोल्हापूरमध्ये संघटनेच्या राज्यकार्यकारणी बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज मोठा निर्णय घेत महाविकास आघाडीला झटका दिला आहे.  

स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल म्हणाले, महाविकास आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडली आहे. कोल्हापूरमध्ये याबाबतची घोषणा राजू शेट्टी यांनी केल्यामुळे आता आम्ही स्वतंत्र आहोत.

दरम्यान, याआधीच मविआतून बाहेर पडण्याचा सूचक इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय सामुदायिक निर्णय होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीच्या कारभाराला कंटाळले आहेत. याबाबत भाजपची कोणती भूमिका राहील? या प्रश्नावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांचे स्वागतच केले जाईल, असे उत्तर दिले. 

कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी राजू शेट्टी यांनी भाजपला पाठिंबा द्यावा, यासाठी पदाधिकाऱ्यांनी जयसिंगपूर येथे त्यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे आदींचा समावेश होता.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post