ढोरजळगाव : संपूर्ण लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशाने उच्च जोखीम, पोहोचण्यास कठीण, वीट भट्टी कामगार, ऊसतोड कामगार अशा भागात गरोदर स्त्रिया व शून्य ते दोन वर्ष मुलांचे एकही लसीकरण न झालेले, अर्धवट लसीकरण झालेले, लाभार्थ्यांना जीवघेण्या आजारांपासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारच्या मिशन इंद्रधनुष 4.0 योजनेचा टप्पा प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र ढोरजळगाव अंतर्गत प्राथमिक आरोग्य वर्धिनी उपकेंद्र नांदूर येथे यशस्वीपणे पार पडला.
कोरोना काळात जागतिक महामारिशी दोन हात करून जिवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचारी यांनी जे काम केले. ते खरंच कौतुकास्पद आहे. नियमित काम , कोविड लसीकरण, करत असताना आरोग्य उपकेंद्र नांदूर येथील ऊसतोड कामगार यांना ऊस तोडत असलेल्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष लसीकरण करण्यात आले.
लसीकरण करून घेण्यास नकार देणाऱ्या पालकांना जीवघेण्या आजारांचे महत्त्व पटवून देऊन लसीकरण करून घेण्यास आरोग्य सेविका गीतांजली कोरडे यांनी प्रवृत्त केले व वंचित बालकांना लसीकरण करण्यात आले.
यावेळी प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुशील बडे यांनी मार्गदर्शन केले. लसीकरण करताना एन. के. बनसोडे, आशा स्वयंसेविका रविता खोसे, सिंधू शिंदे सर्व उपस्थित होते.
यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे लसीकरण स नियंत्रक अधिकारी मयूर धुमाळ यांनी भेट दिली असता सर्व टीमचे कौतुक केले.

Post a Comment