पारनेर : कोरोना महामारीच्या कठीण प्रसंगात किमान पस्तीस हजारा रुग्णांना जीवदान देणारे पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे नाव महाराष्ट्र सह देशभरात पोहोचले आहे. त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे महाराष्ट्रासह गोवा राज्यातही त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असलेला दिसून येत आहे .
कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार निलेश लंके यांचे ज्येष्ठ बंधू दीपक लंके ही गोवा दौऱ्यावर गेले असता गोवा राज्यात प्रत्येक ठिकाणी आमदार निलेश लंके यांच्यावर प्रेम करणारे सहकारी मित्र मोठ्या प्रमाणात गर्दी करत असलेले दिसून येत आहे.
दीपक लंके यांचा अनेक ठिकाणी यथोचित सन्मान करत कोरोना महामारीच्या काळात योगदान देणाऱ्या आमदार निलेश लंके यांच्यावर स्तुती सुमणे उधण्यात येत आहे .
आमदार निलेश लंके यांचे विश्वासू सहकारी गोवा म्हापसा येथील साई बाबा दिंडी सोहळा ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मोराजकर , म्हापसा गावचे सरपंच सोनल नाईक व सर्व सहकारी यानी दिपक लंके व सहकारी यांचे स्वागत केले.
यावेळी दीपक लंके यांच्या समवेत भाऊशेठ निवडुंगे , बोर्गे साहेब , महिंद्राशेठ शिंदे , सुहास नगरे यांच्यासह साई बाबा दिंडी ट्रस्टचे अनेक मान्यवर व गोवा राज्यातील अनेक सहकारी मित्र या वेळी उपस्थित होते .

Post a Comment