महिलेचा अश्लिल व्हीडीओ समाज माध्यमावर अपलोड केल्या प्रकरणी गुन्हा...

राहाता : महिलेने फेसबुकवर टाकलेल्या व्हिडियो मार्फिंग करून त्याठिकाणी अश्लील व्हिडियो अपलोड करत महिलेच्या नंबरवर पाठवून बदनामी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी त्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे फेसबुकवर पेज आहे. या पेजवर लाईव्ह व्हिडिओ अपलोड केले होते. एका अनोळखी व्यक्तीने त्या व्हिडिओ मध्ये मार्फिंग करत अश्लिल व्हिडिओ अपलोड केला. 

फिर्यादी महिलेच्या फोटोखाली अश्लिल मजकूर लिहिला. त्याची व्हिडिओ क्लिप महिलेच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली. त्यामुळे महिलेला प्रचंड मानसिक त्रास झाला. या महिलेने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यांनी पोलिसांत फिर्याद देण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात येऊन याबाबतची फिर्याद दिली.

पोलिसांनी त्या मोबाईलधारकाविरूध्द विनयभंग आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करून त्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post