मुंबई : जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
सध्या राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कमीत कमी ५५ व जास्तीत जास्त ८५ अशी सदस्य संख्या अशी आहे. ग्रामीण भागातील घटत चाललेल्या लोकसंख्येमुळे सुधारित सदस्य संख्या करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला किमान ५० जागा देण्यात येतील. या संदर्भातील अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल.
शिंदे सरकारने सध्या महाविकास आघाडी सरकारचे सर्वच निर्णय रद्द करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या सरकारने काही तरी ठोस निर्णय घ्यावे, अशी सर्वांची अपेक्षा आहे. मात्र शिंदे सरकार फक्त महाविकास आघाडीचे निर्णय रद्द करण्यावर भर देत आहे.
Post a Comment