नगर ः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया पार पडली. यामध्ये आढळगाव गटात अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडल्याने तिढा निर्माण झाला आहे.
या संदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्याने याबाबत आता जिल्हा प्रशासन राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविण्याची गडबड आज दुपारपर्यंत प्रशासनाची सुरु होती.
जिल्हा परिषदेच्या ८५ व पंचायत समितीच्या १७० गणाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया गुरुवारी पार पडली. या आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेमुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
मात्र या आरक्षण सोडतीवर आढळगाव गटातून आक्षेप घेण्यात आला. या संदर्भात सुरवातीला दोन हरकती जिल्हा प्रशासनाला सादर झालेल्या आहेत. त्यानंतर एकूण 70 तक्रारी दाखल झालेल्या आहेत.
या हरकतींवर आता जिल्हा प्रशासन मार्गदर्शन मागविणार आहेत. त्यानंतर त्या गटातील आरक्षणाचा तिढा सुटणार आहे. सध्या या मुद्यावर जिल्ह्यात चांगलीच राजकीय चर्चा सुरु आहे.
हे आरक्षण बदलले तर संपूर्ण जिल्ह्याची आरक्षण सोडत निघणार का याविषयी सध्या जिल्ह्यात चर्चा सुरु झाली आहे.आढळगाव सारखाच इतर तालुक्यात असाच प्रकार झालेला असून या संदर्भात हरकती झालेल्या आहेत.
आढळगाव गटातील एकमेव आरक्षण बदलणार होणार आहे. या गटासाठी सर्वाधिक हरकती दाखल झाल्या असून फक्त आढळगाव गटाबरोबर संगमनेरातील आरक्षण बदलणार आहे.
Post a Comment