मुंबई : संजय राऊत यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर राज ठाकरेंचा जुना एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये राज ठाकरे म्हणाले होते की, " महाराष्ट्रात एकेकजण अटकेत गेले की शरद पवार पंतप्रधानांची भेट घेतात आणि पुढचा नंबर लावतात.
पवार साहेब खुश झाले की भीती वाटायला लागते. आज शरद पवार संजय राऊत यांच्यावर खुश आहेत, पण त्यांना कधी टांगलेलं दिसेल कळणार नाही,असन त्या व्हीडीओत आहे.
संजय राऊतांच्या अटकेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या की, संजय राऊतांवर अशी कारवाई होणार याची कुणकुण आधीच होती. त्यामुळे यात केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करायचं हे आम्ही पहिल्या दिवसांपासून ठरवलं होतं.
संजय राऊत यांच्या घरावर जप्ती आणल्यानंतर शरद पवार थेट पंतप्रधान मोदींच्या केबिनमध्ये पोहोचले होते. मोदींसोबत ईडीच्या कारवायांबाबत चर्चा केल्याचा दावा खुद्द शरद पवारांनीच केला होता.
Post a Comment