कर्जत : आमदार रोहित पवार यांना कर्जतमधील ग्रामपंचायत निवडणुकीत धत्ता बसला आहे. पवार गटाला तीन ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाची चाखावी लागली आहे.
आमदार रोहित पवार आमदार असलेल्या कर्जत-जामखेडमध्ये भाजपने विजयी घोडदौड सुरू केली आहे. कर्जत तालुक्यातील तीनही ग्रामपंचायती राम शिंदे यांच्या ताब्यात आल्या आहेत.
विधान परिषदेवर निवडून येताच राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड पंचायत समितीत परिवर्तन घडवून दाखवले आहे. कर्जत जामखेड पंचायत समितीचा निकाल हा रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
राज्यात सत्ता परिवर्तन होताच ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवारांना धक्का बसला आहे.कर्जत तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायत राम शिंदे गटाकडे आल्या आहेत, तसा दावा राम शिंदे यांनी केला आहे.
भाजपचे कोरेगावमध्ये 13 पैकी 7, बजरंगवाडीत 7 पैकी 5 व कुळधरणमध्ये (बिनविरोध)13 पैकी 7 सदस्य विजयी झाले आहेत. आगामी काळात भाजप जोरदार मुसंडी मारील, अशा चर्चा सध्या सुरु झाली आहे.
Post a Comment