जिल्हा परिषद निवडणुकीत पवार पुन्हा सक्रीय ...


अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असतानाच राज्य सरकारने गट व गण रचना जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्याने गट व गण निर्मिती झालेले रद्द झाले असल्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. काहींना यामुळे पुन्हा निवडणुकीला उभी राहण्याची संधी मिळाली आहे.

आढळगाव गट सुरुवातीला प्रशासनाच्या चुकीमुळे आरक्षित झाला होता. त्यामुळे हरकतींचा पाऊस पडल्यामुळे पुन्हा आरक्षण निघणार असल्यामुळे या गटात उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असणारे पेडगावचे माजी सरपंच रोहिदास पवार (आर के) यांनी गटात संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. पवार हे भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.


आढळगाव जिल्हा परिषद गटाचे आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजला प्रशासनाने २००७चे शुध्दीपत्रक ग्राह्य न धरता आरक्षण सोडत काढली होती. त्यात प्रशासनाने केलेली चूक अनेकांनी लक्षात आणून दिल्यावर या गटाचे आरक्षण पुन्हा निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यात गट व गण रचना २०१७ प्रमाणेच ठेवण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. 

आढळगाव जिल्हा परिषद गटातुन उमेदवारी करण्यासाठी मागील वर्षभरापासून रोहिदास पवार यांनी गटात संपर्क वाढविला होता पण आरक्षण सोडतीत गट आरक्षित झाला होता. म्हणून पवारांचा काही प्रमाणात भ्रमनिरास झाला होता. हरकतीनंतर गटाचे आरक्षण पुन्हा निघणार म्हणून पवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांनी पुन्हा नव्या जोमाने गटात भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post