नगर : पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने सीना नदीला पूर आलेला आहे. या पुराचे पाणी अनेक घरात शिरल्याने नगरमध्ये मोठे नुकसान झालेले आहे.
मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी वाढलेली आहे.
रोज सध्या पाऊस हजेरी लावत आहेत. नको तो पाऊस म्हणण्याची वेळ शेतकर्यांवर आलेली असली तरी रोज पाऊस होत आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे.या पावसाने पिंपळगाव माळवी परिसरातील ओढे नाले तुडुंब भरले असल्याचे ग्रामस्थांना सांगितले.
मंगळवारी झालेल्या पावसाने शहरात हाहाकार उडाला आहे. या पावसात अनेक घरात पाणी शिरले असून नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. सीना नदीला आलेले पाणी पहायसाठी नागरिकांनी रात्री गर्दी केली होती.
Post a Comment