नगर : कोरोना काळात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी जेव्हढा मान-सन्मान कमावला होता. तेव्हढा मान-सन्मान आज वार्षिक सभेत गोंधळ घालून गुरुजींनी गमावला आहे.
शिक्षक बँकेची वर्षिक सर्वसाधारण सभा म्हटली की, सर्वसामान्य सभासद व विरोधी मंडळांना बँकेच्या कारभावर बोलण्याचे हक्काचे व्यासपीठ असायचे त्यामुळे वार्षिक सभेला सभासदांची मोठी उपस्थिती असायची परंतु शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर होत आहे.
या सभेकरिता सत्ताधा-यांच्या सभासदविरोधी कारभारामुळे सभासदांनी पाठ फिरवल्याचे पहायला मिळाले.त्यामुळे शिक्षक बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी मंडळावर शिक्षक बँकेची वार्षिक सभा कोरमअभावी अर्धा तास तहकुब करण्याची नामुष्की आज ओढावली असल्याची चर्चा समाज माध्यमावर सुरु होती.
निवडणूक असल्यामुळे सभासदांपुढे आपले वर्चस्व मिळविण्यासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे. गोंधळ कोणाच्या पथ्यावर पडणार हे येणार्या काळात स्पष्ट। होणार आहे.
Post a Comment